Home » महाराष्ट्र » ब्रेकींग : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न !

ब्रेकींग : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न !

नवीमुंबई ( वास्तव पोस्ट ) : बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची घटना समोर आली आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत: वर गोळी झाडली असल्याचे समजते आहे. अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अक्षयची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदेंने पोलीसांची बंदूक हिसकावून स्वत:वर गोळी झाडली आहे. तीन राऊंड फायर झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला. यावेळी अक्षयला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहे. अक्षयची प्रकृती गंभीर आहे. त्याला तुरुंगातून पुन्हा पोलीस कस्टडीत नेत असताना हा प्रकार घडला. ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने त्याच्या शेजारी बसलेल्या अधिकाऱ्याची बंदुक हिसकाऊन घेतली आणि स्वत:वर गोळी झाडून घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!