Home » जळगाव » राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त शरीरशुद्धी शिबिर संपन्न ; सोहम योग अँड नॅचरोपॅथी विभागाचा उपक्रम

राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त शरीरशुद्धी शिबिर संपन्न ; सोहम योग अँड नॅचरोपॅथी विभागाचा उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सातव्या राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त मू. जे.(स्वायत्त ) महाविद्यालयाच्या सोहम योग – निसर्गोपचार विभागाद्वारे द्वारे मू. जे. महाविद्यालय परिसरात तीन दिवसीय शरीरशुद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय बॉडी डिटॉक्स कॅम्प चे आयोजन निसर्गोपचार केंद्राचे समन्वयक व योग -निसर्गोपचार तज्ञ प्रा. अनंत महाजन आणि प्रा. सोनल महाजन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.

पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी कॅम्प ची सुरुवात शंखनाद योगाभ्यास प्राणायाम नस्यविधी याने होऊन त्यानंतर या तीन दिवसात पंचमहाभौतिक चिकित्सेतील एकूण २१ उपचार शिबिरार्थी साधकांना दिले गेले. त्याचबरोबर प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.  शिबिरामध्ये सहभागी महिला आणि पुरुषांना खूपच उत्कृष्ट आरोग्यदायी परिणाम अनुभवास आले.

राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त  शिबिराच्या आयोजनासाठी मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सं. ना. भारंबे सर यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले. सोहम विभागाचे संचालक व महाविद्यालयाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. देवानंद सोनार यांचेही सहकार्य लाभले. या तीन दिवसीय  शिबिराच्या सफलतेसाठी निसर्गोपचार विभाग समन्वयक प्रा. अनंत महाजन, प्रा. सोनल महाजन यांच्यासह प्रा.पंकज खाजबागे, शर्मिला काळे, जयश्री नारखेडे, भावना शर्मा, सपना हिवाळे, मीनल इंगळे, निलेश वाघ, राजय सुरवाडे, मधु चौधरी, वरदा तळेले, राखी सोनवणे, निकेश पवार, कैलास पवार, जयश्री, सुनीता पवार, तारका महाजन यांनी मोलाचे सहकार्य केले.

अशा प्रकारच्या शरीरशुद्धी शिबिराचे आयोजन वारंवार होत राहावे जेणेकरून निसर्गोपचार पद्धतीचा प्रचार प्रसार होईल आणि सर्वांना औषधांशिवाय सुद्धा स्वस्थ राहता येईल. निसर्गातील तत्त्वांचा उपयोग करून शरीराला शुद्ध आणि स्वस्थ ठेवण्याचा निसर्गोपचार हा उत्तम पर्याय आहे. अशा प्रतिक्रिया शिबिरामध्ये सहभागी साधकांनी व्यक्त केल्या आणि शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सोहम निसर्गोपचार विभागाचे आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!