Home » राजकीय » मविआ’ला मोठा धक्का! आंबेडकर आणि जरांगे पाटील यांच्यात युती; वंचितची पहिली यादी जाहीर

मविआ’ला मोठा धक्का! आंबेडकर आणि जरांगे पाटील यांच्यात युती; वंचितची पहिली यादी जाहीर

अकोला | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज) – लोकसभा २०२४ च्या निवडणुका तसेच लोकसभेसाठी वंचितची वाटचाल याविषयावर काल वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कालच्या बैठकीत काय चर्चा झाली व लोकसभेसाठी वंचितची क़ाय रणनीति राहील यावर वंचित बहुजन आघाडीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित होते.

दरम्यान पत्रकार परिषदेस संबोधित करतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जे आमच्या सोबत समजोता करायला उत्सुक होते, त्यांना मी वारंवार सांगत होतो की जरांगे पाटील हा फॅक्टर लक्षात घ्या, परंतु त्यांनी जरांगे हा फॅक्टर काही लक्षात घेतला नाही. म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची मी स्वतः आणि फारूक रामवत किसन चव्हाण अशी बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या फेजच्या निवडणुकीची चर्चा झाली आहे, मात्र दुसऱ्या फेजची असणारी चर्चा ३१ मार्च १आणि २ एप्रिल ला पूर्ण करण्याचे ठरले. जरांगे पाटील यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली. शेतकरी, बेरोजगारांचा प्रश्न आणि विशेषतः ॲग्रो इंडस्ट्रीला प्राधान्य देऊन ग्रामीण भागातुन उद्योजक आणि व्यवसाय कसे निर्माण करता येतील यासोबतच इतर अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली.

आजपर्यंत ओबीसी समाजचे एक दोन व्यक्ति सोडल्या तर गेल्या गेल्या सत्तर वर्षात ओबीसीचे चेहरे प्रतिनिधि म्हणून दिलेले नाही. त्यामुळे यावेळी ओबीसी, भटक्या विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता यासमुहातून देखील उमेदवारी द्यायची व त्यांना जिंकुनही आणायच आहे. तसेच भाजपने मुस्लिमानचे जे आयसोलेशनचे राजकारण सुरु केले आहे, त्याला थांबविण्यासाठी या लोकसभेसाठी मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी मिळणार आहे. जैन समाजालाही उमेदवारी देऊन त्याला जिंकुन आनण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमचे उमेदवार गरीब व स्वछ प्रतिमेचे असतील. ‘भाजपने मुस्लिमांना एकटं पाडण्याचं राजकारण सुरू केलं आहे. त्याला उत्तर म्हणून आम्ही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उपेक्षित, वंचित, गरीब मराठा, मुस्लिम आणि इतर घटाकांनी मिळून एक नवीन वाटचाल सुरु केली आहे. या वाटचालीला जन समाजातुन पाठिंबा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

राजकारणात मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जातो. त्यामुळे निवडुन गेल्याची बांधीलकी ही मतदाराबरोबर रहात नाही. डोनेशन देणारे आणि घेणारे यांच्यातच बांधीलकी होते. अशी परिस्थिती होऊ नये म्हणून गावागावाने आणि कार्यकर्त्याने प्रचार सुरु केला पाहिजे. शासनाने ठरवून दिलेल्या खर्चात किंवा त्यापेक्षा कमी पैशात या निवडणूका पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहील. योग्य, स्वछ प्रतिमा असलेल्या आणि लायक उमेदवाराला आमच्यकडून उमेदवारी मिळेल. तसेच आजच्या आयाराम गयाराम पद्धतीलाही आपण थांबविणार असल्याचे प्रकाश आंबेडकारांनी यावेळी सांगितले.

अकोल्यातून प्रकाश आंबेडकर लढणार !
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाच्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली. प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोला मतदारसंघातून लढणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सांगलीत प्रकाश शेंडगे हे उभे राहिल्यास त्यांना पाठिंबा दिला जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा

  • भंडारा-गोंदिया – संजय गजानन केवट
  • गडचिरोली-चिमूर – हितेश पांडुरंग मढावी
  • चंद्रपूर – राजेश बेले
  • बुलढाणा – वसंत राजाराम मगर
  • अकोला – प्रकाश आंबेडकर
  • अमरावती – कुमारी प्राजक्ता तारकेश्वर टिल्लेवार
  • वर्धा – प्रा. राजेंद्र साळुंखे
  • यवतमाळ वाशिम – खिमसिंग प्रतापराव पवार
  • नागपूर – काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा
  • सांगली – प्रकाश शेंडगे उभे राहिल्यास पाठिंबा

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!