मुंबई | दि.२६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात आले. यानिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
महाराष्ट्रात ५ ठिकाणी क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकसाठी सुमारे १३५.०५ कोटी रुपये खर्च येणार आहे. जिल्हा रुग्णालय पुणे येथे २०० खाटा तर अहमदनगर बीड, बुलढाणा जिल्हा रुग्णालयासाठी प्रत्येकी ५० खाटांचे नियोजन आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, जि. नंदुरबार ५० खाटा समावेश आहे.
सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासना तर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात आले असून, या२२३ कोटी रुपये खर्चाच्या आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथून दुरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात आले.सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दादा भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आदिवासी विकास मंत्री डॉ.राजेंद्र गावित , शिक्षण मंत्री दीपक केसरकर , जल व मृदुसंधारण मंत्री संजय राठोड , क्रीडा मंत्री संजय बनसोड , मुख्यमंत्री कार्यालय प्रधान सचीव, विकास खारगे, प्रधान सचिव भूषण गगराणी , प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, अपर मुख्य सचिव आरोग्य सेवा मिलिंद म्हैसकर , आरोग्य सेवा सचिव नवीन सोना, संचालक आरोग्य सेवा आरोग्य अभियान नवी दिल्ली डॉ. सरोज कुमार डॉ. अतिरिक्त संचालक डॉ. स्वप्नील लाळे ,सहसंचालक डॉ.सुनिता गोलाईत अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर व आरोग्य विभागातील अधिकारी ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच राज्यातील सर्व आरोग्य संस्था या कार्यक्रमासाठी दूर दूरदृश प्रणाली द्वारे उपस्थित होत्या.
