शिर्डी ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस BOSS च्या माध्यमातून राज्यस्तरीय दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिर्डी येथील ‘श्री साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल’ येथे थाटामाटात संपन्न झाला. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून गुणवंत आपल्या पालकांसह आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत व परिचय करुन देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन तानाजी वामनराव गोंदकर होते व कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्षा बोंबले संभाजीनगर या होते. हिंगलाज मातेस स्मरून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला सर्वांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात बोंदकरांनी या कार्यक्रमाची सर्वांगपरी प्रशंशा केली. त्यानंतर ९०% किंवा त्यापेक्षा जास्त प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला एक ट्रॉफी, प्रशस्तीपत्र, आणि ३०० पेजेस ६लाँग रजिस्टर वह्या, साई बाबांची पुस्तके, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् अश्या सर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन निता सचिन भावसार (कुटे) मलकापूर यांनी केले. मंचावर भाऊराव बालमुकुंद राजकुवर पुलगाव, सतीश धारस्कर वर्धा, वर्षा बोंबले औरंगाबाद, संस्थेचे चेअरमन गोंदेकर आणि संस्थेचे अध्यक्ष कैलास भावसार उपस्थित होते. निता सचिन भावसार (कुटे) यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गेल्या महिन्यापासून संस्थेचे राज्यातील सर्व प्रतिनिधी मेहनत घेत होते.
