Home » महाराष्ट्र » बलून बंधारे, पाडळसे धरणासह तापी खोरे योजनेसाठी केंद्र सरकारला साकडे

बलून बंधारे, पाडळसे धरणासह तापी खोरे योजनेसाठी केंद्र सरकारला साकडे

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गिरणा नदीवरील ७ बलून बंधारे, तसेच पाडळसे धरण व तापी खोरे महाकाय पुर्नभरण योजनेसंदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना पत्र पाठविले आहे.

  • अमळनेर तालुक्यातील निम्मनमी (पाडळसे धरण) प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजून ४ हजार ०५५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय) मध्ये समावेश व्हावा.
  • गिरणा नदीवर ७ बलून बंधारे बांधण्यासाठी ३ हजार ३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या प्रकल्पासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या इनोव्हेटिव्ह स्किम अंतर्गत निधी उपलब्ध करुन द्यावा.
  • तापी खोरे महाकाय पुर्नभरण योजनेसाठी १९ हजार २४४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या प्रकल्पाला केंद्रीय पातळीवरुन तात्काळ मंजूरी देण्यात यावी.

अशा मागणीचे पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना पाठविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!