जळगावात इंधन टंचाईच्या अफवेने गोंधळ; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा आज २३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद होणार असल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर ‘पुढील तीन दिवस पेट्रोल मिळणार नाही’ अशा आशयाचे संदेश व्हायरल झाल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने पेट्रोल पंपांवर गर्दी केली. परिणामी, शहरातील मुख्य रस्त्यांवरील पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला…
