मानव सेवा विद्यालयात पुस्तकांची ‘शैक्षणिक गुढी’ उभारून आगळावेगळा गुढीपाडवा साजरा
जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क पारंपरिक गुढीसोबतच ज्ञानाची गुढी उभारण्याच्या उद्देशाने ‘मानव सेवा विद्यालय’ येथे यावर्षीचा गुढीपाडवा अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या ‘समृद्ध ग्रंथालय’ उपक्रमांतर्गत चक्क पुस्तकांची गुढी उभारून वाचन संस्कृती जोपासण्याचा नवा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. वाचन संस्कृतीला चालना देणारा उपक्रम: मानव सेवा विद्यालयात गेल्या काही काळापासून ‘समृद्ध…
