Headlines
Home » राजकीय » राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आशीष शेलार !आजच्या भेटीतुन चांगलीच फलश्रुती होईल : नेते प्रवीण दरेकर

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आशीष शेलार !आजच्या भेटीतुन चांगलीच फलश्रुती होईल : नेते प्रवीण दरेकर

मुंबई, दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजप नेते आशिष शेलार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. आता मनसे देखील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महायुतीत सहभागी होणार काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे . शेवटी काय तर, “सबका साथ सबका विकास.”

मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्यांची भेट घेतली होती. तसंच देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीत आगामी काळात मनसे महायुतीत सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर स्पष्ट उत्तर न देता, आगे आगे देखिये होता है क्या, असं सूचक वक्तव्य केले होते .

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले की “राज ठाकरे आणि आशिष शेलार नेहमीच भेटत असतात. वर्षानुवर्ष त्यांच्या भेटीगाठी होत आल्या आहेत. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत, आजची भेट ही सदिच्छा भेट झाली असावी, त्यातून दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही. दोघांतले संबंध मैत्रीपूर्ण आहेत, ते राजकीय होतील का, याचा निर्णय राज ठाकरे घेतील, असं देशपांडे म्हणाले.

भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, की , सर्व पक्षातील चांगल्या लोकांना एकत्रित करणं, समाज आणि विकासासाठी काही भूमिका घेणं हे स्वागतार्ह असेल. युतीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. मात्र राज ठाकरे भूमिका निश्चित करतील, त्यावेळी भाजपचं राज्य आणि केंद्रीय नेतृत्व चर्चा करुन तसा निर्णय होऊ शकतो. आजच्या भेटीतून चांगलीच फलश्रुती होईल” असं सूचक उत्तर दरेकरांनी दिलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!