Home » जळगाव » जळगाव गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी बबन आव्हाड यांची नियुक्ती

जळगाव गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी बबन आव्हाड यांची नियुक्ती

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी अखेर बबन आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या बबन आव्हाड यांच्याकडे जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याची जबाबदारी आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आव्हाड यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश काढले आहेत. याआधी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी असलेले किसनराव नजन पाटील हे दि.३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने अतिरिक्त पदभार सायबर पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे देण्यात आला होता.

सध्या जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक असलेले बबन आव्हाड यांच्याकडे एलसीबीचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला असल्याच्या वृत्ताला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, आचारसंहिता संपल्यानंतर बबन आव्हाड यांची नेमणूक कायम होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!