Headlines
Home » जळगाव » मू. जे. महाविद्यालयात ‘अण्णासाहेब डॉ. जी.डी. बेंडाळेइंग्लिश वोकॅबलरी कॉम्पिटिशन’ संपन्न

मू. जे. महाविद्यालयात ‘अण्णासाहेब डॉ. जी.डी. बेंडाळेइंग्लिश वोकॅबलरी कॉम्पिटिशन’ संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथे इंग्रजी विभागातर्फे विद्यापीठस्तरीय ‘अण्णासाहेब डॉक्टर जी.डी. बेंडाळे इंग्लिश वोकॅबलरी कॉम्पिटिशन’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सी.ई. एफ.आर. लेवल बी. १ आणि बी. २ मधील सुमारे १५०० शब्दांवर आधारित १०० गुणाची बहुपर्यायी परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील तीन जिल्ह्यांमध्ये पाच महाविद्यालयातील ७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तसेच प्रत्यक्ष ५९ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. संजय भारंबे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य भारंबे यांनी इंग्रजी भाषा अवगत करण्यासाठी आवश्यक शब्दसंग्रह वाढवण्यासाठी या स्पर्धेने केलेल्या मोलाच्या कामगिरीचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

या स्पर्धेमध्ये तौफिक रफिक तडवी (मू. जे. महाविद्यालय) याने प्रथम क्रमांक पटकावत रु. ३,०००, प्रमाणपत्र आणि चषक जिंकले. फिजा नदीम सैय्यद (एस. एस. मानियर विधी महाविद्यालय) हिने द्वितीय क्रमांक मिळवत रु. २,०००, प्रमाणपत्र आणि चषक प्राप्त केले. अर्जुन आण्णा सरोदे (मू. जे. महाविद्यालय) याने तृतीय क्रमांक प्राप्त करत रु. १,०००, प्रमाणपत्र आणि चषक, तर प्रथमेश महेश खेवलकर (मू. जे. महाविद्यालय) यांनी चतुर्थ क्रमांक मिळवत रु. ५००, प्रमाणपत्र आणि चषक जिंकले.  उर्मिला इंदरचंद तिवारी (मू. जे. महाविद्यालय) यांनी पाचवा क्रमांक प्राप्त करत रु. ३००, प्रमाणपत्र आणि चषक प्राप्त केले.

बक्षीस वितरण कार्यक्रमास मानव्यविद्याशाखेचे आधिष्ठाता व  इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ.भूपेंद्र केसुर उपस्थित होते. प्रा. डॉ.योगिनी राजपूत यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. वैभव भालेराव यांनी केले आणि स्पर्धेचे समन्वयक प्रा. डॉ.पंडित चव्हाण यांनी आभार मानले. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यामध्ये प्रा.डॉ.अनिल क्षीरसागर, प्रा.कीर्ती सोनवणे, प्रा.सुनीता तडवी, प्रा.स्वप्नील चव्हाण व प्रा.हर्षल साळुंखे यांनी महत्वाची भूमिका बजावली. स्पर्धेच्या आयोजनामद्धे कला शाखेचे उप प्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!