Home » शैक्षणिक » गुणवत्तापूर्ण उपक्रमासोबतच शिक्षकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणार : कल्पना चव्हाण

गुणवत्तापूर्ण उपक्रमासोबतच शिक्षकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणार : कल्पना चव्हाण

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज) – देशात नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातले आहे. विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबवून उपक्रमशील शिक्षकांच्या माध्यमातून जिल्ह्याला अग्रेसर बनवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. तसेच शिक्षकांचे प्रलंबित असणारे प्रश्न तात्काळ सोडवण्यावर भर असेलच असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव कल्पना चव्हाण यांनी केले.

शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे स्वागत व सत्कार विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी इबटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. आर. धनगर, शिक्षक परिषदेचे नाशिक विभागीय सहसचिव एस एस अहिरे, इशतू संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नरवाडे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी संचालक डॉ. संजीव भटकर, महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक मंडळाचे सहसचिव सुनील वानखेडे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, शिक्षक सेनेचे जिल्हा सचिव आर के पाटील, मनोज खडसे आदींनी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची भेट घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!