Home » राष्ट्रीय » ठराविक रक्कमेच्या व्यवहाराची अलर्ट मेसेज सेवा होणार बंद ; HDFC बँकेचा मोठा निर्णय

ठराविक रक्कमेच्या व्यवहाराची अलर्ट मेसेज सेवा होणार बंद ; HDFC बँकेचा मोठा निर्णय

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सध्या डिजिटल युग असल्याने बऱ्याच ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे आपण पाहतो. अशातच बँकेच्या व्यवहारासाठी आता बँकेत रांगेत उभे न राहाता आपण काही एप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करु शकतो. ऑनलाईन केलेल्या व्यवहाराचे मेसेज आपल्याला बँकेकडून आपल्या मोबाईलवर आपल्याला मिळत असतात. यासाठी खातेदाराला या सेवेकरीता त्याचे ठराविक चार्जेस देखील द्यावे लागतात.

HDFC बँकेच्या आता छोट्या व्यवहारांसाठीही UPI चा वापर वाढला आहे. जेव्हा तुम्ही पेमेंट करता किंवा तुमच्या खात्यात कुठूनतरी पैसे मिळवता, जरी रक्कम फक्त एक रुपया असली तरीही, तुम्हाला एसएमएसद्वारे म्हणजे मजकूर संदेशाद्वारे अलर्ट मिळतो. मात्र, आता प्रत्येक व्यवहारासाठी टेक्स्ट अलर्ट मिळणे आवश्यक नाही. खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक एचडीएफसी बँकेने छोट्या रुपयांच्या व्यवहारांसाठी मजकूर सूचना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेचा हा निर्णय पुढील महिन्याच्या २५ जूनपासून लागू होणार आहे. बँकेने ही माहिती आपल्या ग्राहकांना पाठवली आहे.

एच डी एफ सी बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या माहितीनुसार यापुढे कमी किमतीच्या व्यवहारांशी संबंधित एसएमएस ग्राहकाच्या मोबाईलवर पाठवले जाणार नाहीत. तथापि, पैसे प्राप्त करणे आणि पाठवणे या दोन्हीसाठी अलर्ट मर्यादा भिन्न आहे. बँकेने पाठवलेल्या माहितीनुसार, आता १०० रुपयांपेक्षा कमी व्यवहारासाठी एसएमएस अलर्ट मिळणार नाहीत. याशिवाय ५०० रुपयांपर्यंतच्या क्रेडिटसाठीही कोणताही अलर्ट मिळणार नाही.

दरम्यान अशा प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला ई-मेल सूचना प्राप्त होतील. यासाठी बँकेने सर्व ग्राहकांना त्यांचे मेल आयडी अपडेट करण्यास सांगितले आहे जेणेकरून प्रत्येक व्यवहाराचे अलर्ट त्यांना ई-मेलवर मिळू शकतील. बँकेने छोट्या रुपयांच्या व्यवहारांसाठी टेक्स्ट अलर्ट बंद करण्याचा हा निर्णय पुढील महिन्याच्या २५ जूनपासून लागू होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!