Home » जळगाव » मुळजी जेठा महाविद्यालय येथे एड्स सप्ताह साजरा

मुळजी जेठा महाविद्यालय येथे एड्स सप्ताह साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक एड्स दिनानिमित्त मुळजी जेठा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना शासकीय रुग्णालय जळगाव येथे रुग्णालयाचे अधिष्ठता यांनी एड्स जनजागृती बद्दल शपथ दिली. त्यानंतर स्वयंसेवकांनी गावामध्ये रॅली काढून एड्सबद्दल समाजामध्ये जागृतीपर संदेश दिला. सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांनी गावामध्ये पथनाट्य साजरे करून समाजात एड्स जनजागृती केली. या सप्ताहमध्ये पोस्टर स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांकडून पोस्टर घेऊन पोस्टरद्वारे समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.

एड्स सप्ताहाची सांगता दि. ८ डिसेंबर रोजी झाली. यावेळी प्रा. डॉ. भूषण कवीमंडन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एड्सबद्दल विशेष असे मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात त्यांनी एड्सचा प्रसार कसा होतो त्याचा उगम कुठून झाला व समाजातील घटकांनी त्याबद्दल कशी जागरूकता ठेवली पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन स्वयंसेवकांना केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विशाल देशमुख सहाय्य कार्यक्रमाधिकारी डॉ. अखिलेश शर्मा, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.जयश्री भिरूड उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.भिरुड यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ.विशाल देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भावेश इंगळे, योगेश भोई, मयुरी पाटील, जीवन शेळके, गोपाल पाटील व मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!