जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा वकील संघाची २०२५-२६ साठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सहसचिव पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून ॲड. लीना अनिल म्हस्के -फिरके निवडणूक लढवीत आहेत.
आपली उमेदवारी आणि जळगाव जिल्हा वकील संघात करायच्या विविध कामांच्या संदर्भामध्ये ॲड. लीना अनिल म्हस्के -फिरके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ॲड. लीना अनिल म्हस्के -फिरके बोलताना म्हणाल्या की, जळगाव जिल्हा वकील संघामध्ये बरेचसे बदल करायची गरज आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येत आहे आणि तो दूर करणे आवश्यक आहे. न्यायालयामध्ये नव्याने पदवी घेऊन येणाऱ्या तरुण वकील मुलांना योग्य अशी वागणूक दिली गेली पाहिजे जी आता दिली जात नाही. आपण घेतलेल्या शिक्षणाचा पुरेपूर मोबदला नवीन आलेल्या तरुण वकीलांना मिळत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडते.
याशिवाय वयोवृद्ध झालेल्या वकील मित्रांच्या मदतीसाठी कोणतीही व्यवस्था, विमा सदृश्य व्यवस्था केलेली नसल्याने त्यांनी वृद्धापकाळात आपले जीवन कसे जगावे ? हा मोठा प्रश्न आहे. याशिवाय महिला वकिलांसाठी न्यायालयामध्ये असलेल्या शौचालयाची व्यवस्था चांगली नाही. हिरकणी कक्ष या ठिकाणी बघायला मिळत नाही. यासारख्या अनेक समस्यांच्या संदर्भामध्ये कार्य करण्यासाठी ही निवडणूक आपण लढवत आहोत, अशी स्पष्ट भूमिका ॲड. लीना अनिल म्हस्के -फिरके यांनी स्पष्ट केली आहे.
जळगाव जिल्हा वकील संघाची निवडणूक ५ ऑगस्ट २०२५ सकाळी आठ ते दुपारी चार या वेळात होणार आहे. तेव्हा या निवडणुकीत सहसचिव पदासाठी आपल्याला विजयी करावे, असे आवाहन देखील ॲड. लीना म्हस्के -फिरके यांनी केले आहे.
