Home » जळगाव » अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; ८ वाहने केली जप्त !

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; ८ वाहने केली जप्त !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मोहाडी धानोरा रस्त्यावर आज मंगळवार दि. २८ रोजी मध्य रात्रीच्या सुमारास तालुका पोलीस स्टेशन तसेच महसूल पथक यांच्या संयुक्त कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे.

अवैध वाळू वाहतुकीला नागरिकांनी कमालीचा विरोध दर्शविल्यानंतरही अवैध वाळू सुरुच आहे. भरधाव जाणाऱ्या या वाहनांमुळे अनेक निरपराध नागरिकांचे बळी देखिल गेले आहेत. गेल्या काही दिवसात अनेक अपघात शहरातून जाणाऱ्या महामार्गावर झाले असून नागरिकांमध्ये असंतोष आहे.

दरम्यान आज रात्री २:३० च्या सुमारास मोहाडी धानोरा रस्त्यावर आज मंगळवार दि.२८ रोजी मध्य रात्रीच्या सुमारास तालुका पोलीस स्टेशन तसेच महसूल पथक यांच्या संयुक्त कारवाईत ४ ट्रॅक्टर, २ डंपर, १ एल पी, १ हायवा असे एकूण ८ अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडून प्रशासकीय इमारत आवार जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा करण्यात आले.

या धडक कारवाई मध्ये आंधळे भाऊसाहेब, वंजारी भाऊसाहेब, ग्रा.म. अधी. ठाणगे आप्पा, जामोदकर आप्पा, अहिराराव आप्पा, वाहन चालक सुरेश महाजन, तालुका पोलीस स्टेशन जळगाव चे पथक तसेच पोलीस मुख्यालयातील क्यूआरटी पथक सदर कारवाईत सहभागी होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!