जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच अतुल पाटील आणि पराग राणे यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगितली. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विषयी प्रतिज्ञा घेतली. यावेळी प्रतिभा लोहार, डी.ए.पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निर्मल चतुर यांनी केले.
