जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे ‘एक पेड मा के नाम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, माजी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, माजी नगरसेविका गायत्री राणे, माजी नगरसेविका, अजित राणे प्राचार्य अशोक राणे के.सी.ई. सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक शशिकांत वडोदकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. सदर कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली.

याप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रमात विद्यार्थ्यांनी व पालकांनी, शिक्षकांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यात यावी, तसेच पर्यावरण समतोल राखून शेतकऱ्यांवर येणारे नैसर्गिक संकट दूर करण्यात आपण हातभार लाऊन सामाजिक दायित्व पार पाडावे. तसेच विद्यार्थ्यांना गणपती प्रदक्षिणाची गोष्ट सांगत आपल्या आयुष्यात आई वडील व शिक्षक यांचे स्थान महत्त्वाचे असल्याचे सांगत सर्वाना गणेशोत्सवनिमीत्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्ष भेट देऊन संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. शाळेत मान्यवरांकडून वृक्ष लागवड करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी व आभार प्रदर्शन नरेंद्र पालवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डि.ए.पाटील, आर.एन. तडवी, वेदप्रकाश आर्य, विवेक मोरे, पराग राणे, चेतन सोनार, सुचिता बाविस्कर, रोशनी कोळी, हेमलता भोळे, प्रीती रडे, प्रविण महाजन, चंदन खरे, अनिल शिवदे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
