मुंबई दि. ६ ( प्रतिनिधी ) – मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य पातळीवर सर्वेक्षण चालू असलेलं सर्वेक्षणाचं हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी येत्या १५ फेब्रुवारी रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं जाईल . याबाबत मंत्री दीपक केसरकर म्हणाले, की मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी चालू असलेलं सर्वेक्षण पूर्ण होत आलं आहे. हे सर्वेक्षण मागासवर्ग आयोगाकडे गेलं आणि त्यावरील मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर आम्ही ताबडतोब विधानसभेचं अधिवेशन बोलावणार आहोत.
