Home » जळगाव » पर्यावरणीय संसाधनाचा नाश रोखण्यासाठी वन व पोलिस विभागाकडून संयुक्त बैठक संपन्न

पर्यावरणीय संसाधनाचा नाश रोखण्यासाठी वन व पोलिस विभागाकडून संयुक्त बैठक संपन्न

जळगाव | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पर्यावरणीय संसाधनांचा नाश रोखण्यासाठी बैठक संपन्न झाली. वन विभाग, पोलीस विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी व समनव्यातुन पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेबाबत चर्चा करण्यात आली. वनव्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी दिले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी व यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री जमीर शेख यांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!