Home » जळगाव » बॉस संघटनेतर्फे भावसार समाजाचा १३ जिल्ह्यात वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम संपन्न

बॉस संघटनेतर्फे भावसार समाजाचा १३ जिल्ह्यात वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस (BOSS) तर्फे दि.२८ जुलै रोजी जागतिक प्रकृती संवर्धन दिनानिमित्त नियोजित असलेला वृक्षारोपण बॉस या संघटनेतर्फे भावसार समाजाचा महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यात भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यवतमाळ, सटाणा, मालेगाव, वर्धा, मलकापूर, निजामपूर, जालना, जळगाव, नांदेड, बीड, संभाजीनगर, धाराशिव, अकोला, धुळे, नंदुरबार, तुळजापूर सर्वच ठिकाणी भावसार समाजाच्या वतीने वृक्षारोपणाच्या कार्यक्रम २८ जुलै रोजी सोयीच्या वेळे नुसार करण्यात आला. अनेक ठिकाणी पाऊस असताना सुद्धा समाजबांधव एकत्रीत येऊन मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी बाहेर निघाले होते. वृक्षारोपणाच्या निमित्ताने भावसार समाज एकत्र यावा ही एक मोठी संकल्पना या कार्यक्रमामागे होती.

कार्यक्रमासाठी नियुक्त जिल्हा प्रतिनिधी यांनी खूप मेहनत घेतली नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी प्रवीण मधुकर भावसार, धुळे जिल्हा प्रतिनिधी मनोज कांतीलाल भावसार, जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्रवीण सिताराम भावसार, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नीता कुटे भावसार, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी अभय येलणे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी सतीश धारस्कर, जालना जिल्हा प्रतिनिधी अमोल सरोदे, बीड जिल्हा प्रतिनिधी शिवप्रकश धोत्रे, तुळजापूर जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर खोले, अकोला जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर विजय जीराफे, धाराशिव जिल्हा प्रतिनिधी ज्योती संतोष हंबीरे, नांदेड जिल्हा प्रतिनिधी सीमा दिलीप क्षीरसागर, औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी वर्षा देवेंद्र बोंबले, नाशिक जिल्हा प्रतिनिधी प्रकाश चुनीलाल भावसार, निजामपूर येथे कैलास मुकुंद भावसार या सर्व जिल्हा प्रतिनिधींनी उत्साहात भाग घेऊन आपआपली जबाबदारी ओळखून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

संस्थेचे अध्यक्ष कैलास शरदचंद्र भावसार नंदुरबार, सचिव गिरीश रमणलाल भावसार जळगाव यांनी सर्वांचे कौतुक केले. पुढे असेच कार्यक्रम साजरे करावेत असे सर्व प्रतिनिधींना कळवले आहे. महाराष्ट्रातील भावसार समाजात हा असा कार्यक्रम प्रथमच राबवण्यात आला त्यामुळे या कार्यक्रमास अतिशय उत्साह निर्माण झाला. यावेळी सर्वांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम आनंदात पार पडला.

जळगाव येथील जिल्हा सामान्य रुगणालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर साहेब यांच्या शुभ हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. आज ५९० वृक्ष लागवड केली असून त्यात पिंपळ, कडुनिंब, वटवृक्ष, चिंच, कवठ, बेल, आवळा, आंबा, कदंब, करंज असे विविध प्रकारचे वृक्ष आहेत. फक्त फोटो पुरते वृक्षारोपण न करता पुढील वर्षी या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प करून प्रत्येकाने वृक्ष लागवड करून झाडांचे संगोपन करावे, असे मार्गदर्शन जिल्हा आरोग्यधिकारी डॉ.सचिन बाहेकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

वसंत पाटील म.न.पा. अधिकारी यांनी देखील आपल्या मनोगतात वृक्ष लागवड महत्व वर्णन केले. सर्व समाजबांधवांच्या विशेष उपस्थिती होती व सर्वांनी वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतली. आजचा वृक्षारोपण आणि संवर्धन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!