Home » जळगाव » पंतप्रधान दौरा : जळगाव विमानतळापासून ५० किलोमीटर क्षेत्र २२ ते २५ ऑगस्ट ‘नो फ्लाईंग झोन’

पंतप्रधान दौरा : जळगाव विमानतळापासून ५० किलोमीटर क्षेत्र २२ ते २५ ऑगस्ट ‘नो फ्लाईंग झोन’

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.२५ ऑगस्ट रोजी जळगाव येथे ‘लखपती दीदी’ या कार्यक्रमाला येणार आहेत. त्या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून ५० किलोमीटरच्या परिघात “205741N”, “0753729E” आणि वरील निर्देशांकाच्या जमिनीपासून ४००० फूट अंतरावर दि.२२ ऑगस्ट ते दि.२५ ऑगस्ट पर्यंत “नो फ्लाइंग झोन” म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढले आहेत.

या आदेशात ड्रोन, पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट्स, खाजगी हेलिकॉप्टर, पॅरामोटर, हॉट एअर फुगे इत्यादींच्या उड्डाणांवर दि.२२ ऑगस्ट ते दि.२५ ऑगस्ट बंदी घालण्यात आली आहे. तर पंतप्रधानांच्या जळगाव दौऱ्याशी संबंधित महत्वाच्या, तसेच अति महत्वाच्या विमानाचे उड्डाणे वगळता व्यवसायिक विमानांचे उड्डाण दि.२४ ऑगस्ट रात्री ८ वाजेपासून दि. २५ ऑगस्ट संध्याकाळी ६ वाजता पर्यंत बंद करण्यात येतील असे आदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!