Home » क्रीडा » ए.टी.झांबरे विद्यालयात नाटक आणि निबंध स्पर्धा

ए.टी.झांबरे विद्यालयात नाटक आणि निबंध स्पर्धा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटक सादर केले. विद्यार्थ्यांसाठी निंबंशही स्पर्धा झाली.

कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एन.सी.सी कॅडेट भाग्यश्री पाटील, रुतुजा पाटील, रोहिणी उमाळे, शर्वरी गायकवाड, प्रणाली पाटील, श्रृती पाटील, विशाखा परदेशी, दीपिका दंडगव्हाळ, खुशी पालवे, युक्ता बारी, शीतल कोल्हे, रोशणी कोळी, रिया पाटील, दिशा शिंपी व अन्य विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटक सादर केले.

‘कारगिल युद्धातील सैनिकांनी केलेले कार्य’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा झाली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक तनुश्री साळुंके, व्दितीय क्रमांक श्रद्धा सोनार, तृतीय क्रमांक दिशा पाटील व उत्तेजनार्थ क्रमांक मिनल पढार या विद्यार्थ्यांनी पटकावला. मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापिका झांबरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यानी सैनिकी प्रशिक्षण घेऊन देशसेवा करावी व देशाभिमान बाळगावा, असे आवाहन केले. विद्यार्थिनी वृषाली आसोदेकर व आर्या शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी स्काऊट व गाइड स्वयंसेवक व शिक्षक चंद्रकांत कोळी, निर्मल चतुर, विवेक मोरे, शिक्षकेतर कर्मचारी चंदन खरे, शुभम तायडे आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!