Headlines
Home » जळगाव » उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त किरकोळ विक्रेत्यांना छत्रींचे वाटप

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त किरकोळ विक्रेत्यांना छत्रींचे वाटप

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने शहरातील किरकोळ विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

सध्या पावसाळा सुरू असून फळ तसेच अन्य वस्तूंची किरकोळ विक्री करणार्‍यांना पावसामुळे खूप त्रास होत असतो. याची दखल घेऊन वैशालीताई सुर्यवंशी यांनी आज पाचोरा शहरात रस्त्यावर व्यवसाय करणार्‍या विविध विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

या माध्यमातून उध्दव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाला जनहितार्थ उपक्रम राबविण्यात आला. अगदी अनपेक्षितपणे पावसाळ्याच्या दिवसात गरज असतांना मोठी छत्री मिळाल्यामुळे विक्रेते भारावून गेल्याचे दिसून आले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासेनेसह विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!