जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात महाकवी कालिदास जयंतीनिमित्त ‘आषाढस्य प्रथमदिवसे’ कार्यक्रम झाला. आषाढाच्या पहिल्या दिवशी ‘महाकवी कालिदास दिन’ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन, प्रास्ताविक, कथाकथन आणि आभार आदी जबाबदारी इयत्ता १० वी क च्या विद्यार्थ्यांनी सांभाळली. यात तुषार पाटील, दिगंबर पाटील, सुमित कावडकर, रोहित सावळे , मिताली पाटील, पूर्वा चौधरी, साक्षी ढाके, तनुश्री सोनार व चेतना काळुंखे यांनी संस्कृत भाषेतून मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमात ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी कालिदास व भोजराजा यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी कथाकथन, संस्कृत गीतगायन व स्तोत्र-पठन केले. मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी महाकवी कालिदासाप्रमाणे काव्यप्रतिभेची उपासना करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांनी महाकवी कालिदास प्रमाणे हजरजबाबी व्हा, असे मार्गदर्शन केले. तसेच संस्कृत विषयाचे शिक्षक वेदप्रकाश आर्य यांनी संस्कृत-भाषेचे उपासक व संरक्षक व्हा, असे आवाहन केले. दिला. फलकलेखन मराठी विषय शिक्षक निर्मल चतुर यांनी केले.
