Headlines
Home » शैक्षणिक » किलबिल बालक मंदिर शाळेत पालक सभा

किलबिल बालक मंदिर शाळेत पालक सभा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर शाळेमध्ये नर्सरी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक उपस्थित होत्या.

किलबिल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांनी शाळेतील कामकाजाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. प्रतिभा जोशी यांनी वर्षभराचा अभ्यास कसा घेतला जाईल? यांचे नियोजन सांगितले.

सूत्रसंचालन रत्नप्रभा नेमाडे यांनी केले. कुंदा भारंबे यांनी आभार मानले आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पालक सभेसाठी सहकार्य केले. यावेळी पालकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तर याच वेळी माता-पालक संघाची निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!