Home » राष्ट्रीय » मोठी बातमी : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे

मोठी बातमी : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे

नवी दिल्ली, दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) छापा टाकल्याची बातमी समोर येत आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या कार्यकाळात किश्तवाडमधील जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित फायली निकाली काढण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असा आरोप मलिक यांनी केला होता. सत्यपाल मलिक हे २३ ऑगस्ट २०१८ ते ३०ऑक्टोबर २०१९ दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते. जम्मू-काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टमध्ये कथित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआय सर्च ऑपरेशन करत आहे.

आपल्या सोशल मिडिया X अकाउंटवरुन माजी राज्यपाल मलिक यांनी सीबीआयच्या या छाप्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात मलिक म्हटले आहेत की, मी गेल्या ३-४ दिवसांपासून आजारी असुन रुग्णालयात दाखल आहे. असे असतानाही सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून माझ्या घरावर हुकूमशहाकडून छापे टाकले जात आहेत. माझा ड्रायव्हर आणि माझा सहाय्यक यांच्यावरही छापे टाकून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांसोबत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!