Headlines
Home » जळगाव » जिल्हावासीयांनी महानाट्याच्या माध्यमातून अनुभवले छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य

जिल्हावासीयांनी महानाट्याच्या माध्यमातून अनुभवले छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य

जळगाव, दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त “जाणता राजा ” हे महानाटय पोलीस कवायत मैदान जळगाव येथे १८ ,१९ आणि २० फेब्रुवारी हे सलग तीन दिवस जळगावकरांना अनुभवता येणार आहे.

या महानाट्ययास सर्वांना प्रवेश मोफत असुन फ्री पास ठेवण्यात आले आहे. फ्री पास मिळविण्यासाठी कलेक्टर ऑफिस, महानगरपालिका , तहसील कार्यालय , शासकीय कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आज १९ रोजी दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी जळगाव जिल्हावासीयांनी जाणता राजा महानाट्याच्या माध्यमातून त्यांचे जीवनकार्य अनुभवले.

जाणता राजा या महानाट्याच्या आजच्या प्रयोगाला राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी यांची उपस्थिती होती .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!