Home » महाराष्ट्र » ‘शिवशाही’ बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

‘शिवशाही’ बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गोंदिया ( वास्तव पोस्ट ) : विदर्भात आज दुपारी १ वाजेच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यात एस.टी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघाताने एसटी महामंडळ हादरले आहे. या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १५ ते २० जणं गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ ही शिवशाही बस पलटी झाल्याने हा अपघात झाला. ही शिवशाही बस भंडाऱ्याकडून गोंदियाकडे निघाली होती. हा अपघात इतका भीषण होता की शिवशाही बसच्या काचा फुटल्या आणि आत असलेले प्रवासी हे अक्षरशः खिडकीच्या बाहेर फेकले गेले. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत बचाव कार्यास सुरुवात केले.

गोंदियामध्ये झालेल्या या भीषण एसटी अपघातानंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांना तातडीने १० लाख रुपये मदत म्हणून देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची माहीती घेऊन जखमी प्रवाशांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!