BREAKING : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी सर्वात मोठा निर्णय ! व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या EWS, SEBC आणि OBC मुलींचे १०० टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने नुकतीच मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली होती. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींची संख्या वाढावी या उद्देशाने राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला होता.
राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी घेण्यात आला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) तसेच इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के ऐवजी आता १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णायाने EWS, SEBC आणि OBC विद्यार्थीनींच्या कुटुंबियांना मिळालेला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सभापती निवडीबाबतही चर्चा झाल्याची बातमी आहे. विधान परिषदेचं सभापती पद सध्या रिक्त आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे या सध्या कार्यवाहू सभापती आहे.
