Headlines
Home » राष्ट्रीय » भारतात १०ॲप्स,५७ सोशल मिडीया हॅंडल, ओटीटी प्लॅटफॉर्म, आणि काही वेबसाईट्सवर बंदी

भारतात १०ॲप्स,५७ सोशल मिडीया हॅंडल, ओटीटी प्लॅटफॉर्म, आणि काही वेबसाईट्सवर बंदी

नवी दिल्ली | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अभद्र, आणि काही प्रकरणांमध्ये अश्लील सामग्री प्रस्तुत करणाऱ्या १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, सोशल मीडिया अकाउंट आणि अनेक वेबसाइटवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, देशभरात १८ ओटीटी प्लॅटफॉर्मला प्रसारण मंत्रालयाकडून अनेकवेळा ताकीद देण्यात आली होती. परंतू त्यांनी सुचनांचे पालन न केल्याने त्यांच्यावर आज केंद्र सरकारने कारवाई केली ,आणि देशभरात १८ ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले.

तसेच OTT प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या १९ वेबसाइट्स, १० ॲप्स प्ले स्टोअर वरील ७ ॲप आणि ॲपल ॲप स्टोअरवरील ३ॲप्ससह आणि ५७ सोशल मीडिया हँडलवर कडक कारवाई केली आहे. या सर्वांवर अश्लील मजकूर दिल्याचा आरोप आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गुरुवारी या प्लॅटफॉर्मवर कारवाई केली. या प्लॅटफॉर्मची यादीही जाहीर करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या तरतुदीनुसार त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, या निर्णयाबाबत इतर अनेक विभाग आणि मंत्रालयांकडूनही मत घेण्यात आले आहे. विभाग आणि मंत्रालयांचे म्हणणे आहे की, या प्लॅटफॉर्मचा मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालणे गरजेचे होते.

बंद करण्यात आलेल्या ओटीटी फ्लॅटफॉर्म्सची लिस्ट :
ड्रीम फिल्म्स, वूवी, येस्समा, अनकट अड्डा, ट्राई फ्लिक्स, एक्स प्राइम, नियॉन एक्स, वीआईपी, बेशर्म्स, हंटर्स, रैबिट, एक्स्ट्रामूड, न्यूफ्लिक्स, मूड एक्स, मॉजफ्लिक्स, हॉट शॉट , वीआईपी, फुगी, चिकूफ्लिक्स, प्राइम प्ले,

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!