Home » सामाजिक » समतोल प्रकल्प व्यवस्थापकांकडून श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी तळागाळातील लोकांना माहीती देऊन जनजागृती .

समतोल प्रकल्प व्यवस्थापकांकडून श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी तळागाळातील लोकांना माहीती देऊन जनजागृती .

जळगाव ( प्रतिनिधि ) संदीप रंधे, दि. २१, अयोध्या येथील श्री रामलला प्राणप्रतिष्ठा निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून देशभरात भक्तिमय व हर्षोल्हासाचे वातावरण असुन सर्वत्र दिवाळी सारखी रोशणाई दिसून येत आहे . जवळजवळ सर्वचजण या सोहळ्याची आतुरतेने वाट पहात आहेत .
अशातच आपल्या तळहातावर पोट घेऊन वणवण फिरणारे रस्त्यावर डोंबारीचा खेळ करुन कसाबसा आपला उदरनिर्वाह करणारे कुटुंब जळगाव रेल्वे स्टेशनवर समतोल प्रकल्पाचे अधिकारी व सदस्यांना दिसले . शिक्षणापासुन कितीतरी दूर असलेले व आपल्या पालकांसोबत भटकंती करणाऱ्या निरागस बालकांना व त्यांच्या पालकांना या सोहळ्याबाबत विचारले असता त्यांना कोणत्याच प्रकारची माहीती नव्हती . या सोहळ्याविषयी कोणीही अनभिज्ञ राहु नये या उद्देशाने केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप पाटील यांनी त्या बालकांना मोठ्या आपुलकीने जवळ व विश्वासात घेऊन सोहळ्याविषयी माहीतीपर मार्गदर्शन केले . त्यांच्या या कार्याला समतोल प्रकल्प सदस्या रवीना भगत यांचे सहकार्य लाभले .
तसेच रेल्वे स्टेशनवरील इतर प्रवासी व परिसरातील नागरिकांना समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची माहीती तसेच समतोल प्रकल्पाबाबत पत्रक व माहीती देऊन जनजागृती करण्यात आली .
अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या म्हणजेच दि. २२ रोजी होत असुन श्री प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे . श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असुन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!