Home » क्रीडा » तिसऱ्या T-20 त भारताचा दमदार विजय. रोहितची (हिटमॅन) वादळी खेळी, ठोकले विक्रमी ५ वे शतक.

तिसऱ्या T-20 त भारताचा दमदार विजय. रोहितची (हिटमॅन) वादळी खेळी, ठोकले विक्रमी ५ वे शतक.

बेंगलुरु : वास्तव पोस्ट , दि.१७ (प्रतिनिधि) काल बेंगलुरु येथे भारत आणि अफगानिस्तान यांच्यात तीसरा टी-20 सामना खेळला गेला हा सामना अतिशय रोमहर्षक झाला . भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी पत्करुन २० षटकात २१२/४ धावा केल्या . डावाच्या सुरवातीला २२ धावात ४ गड़ी झटपट बाद झाल्याने भारतीय गोटात थोड़े चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते . मात्र रिंकू सिंगने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करत ३९ चेंडूत २ चौकार व ६ षटकारांसह ६९ धावा चोपल्या . कप्तान रोहित शर्माने ६९ चेंडूत ११ चौकार व ८ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने वादळी फटकेबाजी करत नाबाद १२१ धावा कूटल्या . या दोघांनी मिळून ५ व्या गड्यासाठी ९५ चेंडूत १९० धावांची नाबाद भागीदारी केली .रोहितचे आंतरराष्ट्रीय टी-20 मधले हे पाचवे शतक ठरले .
अफगानिस्तानने विजयासाठी निर्धारीत २० षटकात २१३ धावांचे लक्ष गाठतांना जोरदार सुरवात केली . गुलबदिन ५५, गुरबाज ५०, इब्राहिमच्या ५० धावांच्या खेळीच्या जोरावर अफगानिस्तानने २१२ धावा केल्या . मात्र दोन्ही संघाच्या २१२ धावा झाल्याने सामना बरोबरीत (टाई) सुटला.
२० षटकाच्या सामन्याचा निकाल न लागल्याने नियमानुसार सामना सुपर ओवर मधे खेळला गेला. त्यात प्रथम फलंदाजी करत निर्धारीत १ षटकात अफगानिस्तानने १६ धावा करून भारतासमोर विजयासाठी १७ धावांचे लक्ष ठेवले. १७ धावांचा पाठलाग करत असतांना भारताला १६ च धावा करता आल्याने हा सामना पुन्हा बरोबरीत सुटला.
सुपर ओवर मधे सामन्याचा निकाल न लागल्याने सामना दुसऱ्यांदा सुपर ओवर मधे खेळला गेला. त्यात प्रथम फलंदाजी करतांना भारताला ११ च धावा करता आल्या .भारताच्या दुसऱ्या सुपर ओवरच्या डावात ४थ्या चेंडुवर रिंकू सिंग झेलबाद झाला व त्यापाठोपाठ ५ व्या चेंडुवर रोहीत शर्मा धावबाद झाल्याने पूर्ण षटक देखील भारताला खेळता आले नाही. अफगाणिस्तानला विजयासाठी १२ धावांचे छोटेशे लक्ष मिळाले असता रवी विष्णोईने आपल्या पहिल्याच चेंडूवर नबीला रिंकू सिंग कडून झेलबाद केले व सामन्यात रंगत निर्माण केली . दूसऱ्या चेंडूवर करीमने १ धाव काढ़ली आणि तिसऱ्या चेंडूवर रिंकू सिंगने सिमारेषेवर गुरबाझचा झेल घेतला.
अशाप्रकारे भारताने हा सामना अतिशय रोमहर्षकरीत्या १० धावांनी खिशात घातला व तीन सामन्यांची ही मालिका ३-० ने जिंकली . मालिकावीर भारताचा अष्टपैलु शिवम दुबे व सामनावीराचा पुरस्कार रोहीत शर्माला देण्यात आला .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!