जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासनाच्या युवा व खेल मंत्रालय अंतर्गत स्पोर्ट्स ऑथोरीटी ऑफ इंडिया मार्फत एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे खेलो इन्डिया रायझींग टॅलेंट आयडेंटीफिकेशन योजनेंतर्गत ९ वर्षे ते १८ वयोगटातील प्रतिभावंत खेळाडूंची चाचणी आयोजित केली आहे. याविषयी जिल्हास्तरीय समितीची बैठक वेवोतोलू केझो (परिविक्षाधीन भा. प्र. से.) यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली.
सदर चाचणी मध्ये दि.३ सप्टेंबर रोजी हॉकी आणि खो-खो तसेच दि. ४ सप्टेंबर रोजी ॲथलेटीक्स आणि वेटलिफ्टींग या खेळाची आणि दि.५ सप्टेंबर रोजी व्हॉलीबॉल व कबड्डी, तर दि.६ सप्टेंबर रोजी फुटबॉल या खेळांची चाचणी सकाळी ८ ते ५ या कालावधी मध्ये दिलेल्या तारखे नुसार होणार आहे. जिल्ह्यातील शाळा तसेच महाविद्यालयातील वय वर्षे ९ ते १८ आतील खेळाडूंना सदर चाचणी मध्ये सहभागी होण्याकरीता तारखे प्रमाणे सकाळी ८:०० वाजता मु.जे. महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुल जळगांव येथे आपल्या क्रीडा शिक्षकांसोबत उपस्थीत रहावयाचे आहे.
तसेच दि.४ सप्टेंबर रोजी क्रीडा राज्य मंत्री, युवा व खेल मंत्रालय, भारत सरकार रक्षा खडसे या चाचणीतील खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी एकलव्य क्रीडा संकुलात उपस्थीत राहणार आहेत. या चाचणीसाठी आपल्या शाळेतील तसेच माहाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी खेळाडूंनी सहभागी व्हावे असे एका पत्रकद्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडून कळविण्यात आले आहे.
