Home » क्रीडा » धर्मशाला कसोटीत रोहित व गिलचे शतकं ; दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे २५५ धावांची आघाडी

धर्मशाला कसोटीत रोहित व गिलचे शतकं ; दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे २५५ धावांची आघाडी

धर्मशाला | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – धर्मशाला येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच ३-१ ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात २१८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत पहिला डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात आठ गडी गमावून ४७३ धावा केल्या. दुसऱ्या दिवस अखेर कुलदीप यादव २७ आणि जसप्रीत बुमराह १९ धावांवर नाबाद असून टीम इंडियाची आघाडी २५५ धावांवर पोहोचली आहे. उद्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा आघाडी आणखी वाढवण्याचा प्रयत्न असेल.

दरम्यान आज सकाळी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी जोरदार खेळी करत शतके ठोकली. रोहितने १६२ चेंडूत १०३ धावा करून बाद झाला तर शुभमन गिलने १५२ चेंडूत ११० धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १७१ धावांची भागीदारी केली. रोहितला स्टोक्सने तर शुभमनला अँडरसनने बाद केले. त्यानंतर पडीक्कल आणि सर्फ़राज ही जोड़ी जमली पडीक्कलने १०३ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारच्या मदतीने ६५ तर सर्फ़राजने ६० चेंडूत ५६ धावां ठोकल्या . जडेजा व जुरेल प्रत्येकी १५ धावांवर बाद झालेत. भारताला ४२८ धावांवर ८ धक्का बसला. १०० वी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनला आपले खातेही उघडता आले नाही. त्याला टॉम हार्टलेने क्लीन बोल्ड केले. एकवेळ भारताची धावसंख्या ४ बाद ४०३ होती, पुढच्या २५ धावांत टीम इंडियाने ४ गडी गमावले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!