बदलापुर अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी ; अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची मागणी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्या महिन्यात आदर्श विद्यालय कुलगाव, बदलापुर जिल्हा ठाणे येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर पालक वर्गाची झोपच उडाली आहे. मुलींना शाळेत कसे पाठवायचे हा मोठा गंभीर प्रश्न पडला आहे. अशा लहान चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची कायदेशीर तपास प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण…
