Headlines

मू.जे. महाविद्यालयात १७-१८ जानेवारीला रंगणार चैतन्य-२०२५ वार्षिक स्नेहसंमेलन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांच्या उत्कट सादरीकरणाचा उत्सव असलेले चैतन्य-२०२५ वार्षिक स्नेहसंमेलन दि.१७ आणि १८ जानेवारी २०२५ ला आयोजित करण्यात आले आहे. या मध्ये सुरुवातीला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी घेतल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धा, बॅटमिंटन स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा ह्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या वतीने आजपासून सुरु…

Read More

लॉस एंजेलिस आग घातपात असल्याचा संशय ! २० संशयित ताब्यात ; आगीत ११ जणांचा मृत्यू !

Los Angeles Wildfires : लॉस एंजेलिस मध्ये जंगलात लागलेली ही आग आता ३५००० एकर परिसरात पोहचली आहे. यामुळे १० लाख घरांना झळ पोहचली असून, हजारो लोकांनी आपली घरे सोडली आहेत. ४.५० लाख करोड नुकसानी चा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, अमेरिकेतील सर्वच विमा कंपन्या चिंतेत आहेत. त्यांच्या मते ही आग इतिहासातील सगळ्यात महागडी ठरू शकते….

Read More

ओरीअन स्कूल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ यांचा जन्म दि.१२ जानेवारी १५३१ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावी झाला. तर स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ साली कलकत्ता येथे झाला. माँसाहेब जिजाऊ…

Read More

मू.जे. महाविद्यालयाचे ‘व्हिडिओ स्पीच’ स्पर्धेत यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरीय ‘व्हिडिओ स्पीच’ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत उत्तुंग यश संपादन केले. नंदुरबार येथील जी.टी. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ७ जानेवारी २०२५ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पूर्वनिर्धारित विषयांवर तीन मिनिटांचा इंग्रजी भाषेतील व्हिडिओ तयार करून सादर करायचा…

Read More

भारत २८ व्या CSPOC चे आयोजन करणार ; AI आणि सोशल मिडियावर लक्ष केंद्रित : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारत २०२६ मध्ये राष्ट्रकुल देशांच्या संसदेच्या स्पीकर आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या २८ व्या परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे, अशी घोषणा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ग्वेर्नसे येथे झालेल्या कॉमनवेल्थच्या (सीएसपीओसी) स्पीकर आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत केली. हा कार्यक्रम संसदीय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सोशल मीडियाच्या वापरावर भर…

Read More

१२वी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध ; डाऊनलोड करण्याबाबत शिक्षण मंडळाकडून सूचना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेश पत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी ‘ऍडमिट कार्ड’ या लिंक द्वारे डाऊनलोड…

Read More

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा : विधानपरिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : नायलॉन मांजामुळे राज्यात काही भागात नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात तर जीवितहानी झालेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणत राज्यात ज्या ठिकाणांहून तसेच ऑनलाइन मांजा विक्री केली जात आहे, अशा ठिकाणी सक्त कारवाई करण्यात यावी. मांजाच्या उपयोग टाळण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना…

Read More

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिकांची अंतिम तारीख ३१ जानेवारी

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची…

Read More

मू.जे. महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत राष्ट्रीय स्तरावरील MAESTRO स्पर्धा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खानदेश कॉलेज एज्यूकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत राष्ट्रीय स्तरावरील MAESTRO स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ऑनलाईन शेअर बाजार, बिझनेस आयडिया, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पॉवर पॉईंट सादरीकरण या चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन. भारंबे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. के.सी.ई….

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वॉर रूम बैठक

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ येथे राज्यातील १९ महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये मेट्रो, महामार्ग, सिंचन, विमानतळ, बंदरे, आणि पर्यटन यासारख्या प्रकल्पांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले, प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या विलंबांवर कठोर…

Read More

मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या विविध कामांची पाहणी

ठाणे ( वास्तव पोस्ट ) : ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून दिलेली कामे गांभीर्यपूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा अत्यंत कठोर शब्दात सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील…

Read More

सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा राष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई सोसायटी संचलित मू.जे. महाविद्यालय जळगाव च्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी तर्फे एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेत करण्यात आले आहे. आधुनिक डिजीटल युगात सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योगाचे महत्व या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत ही परिषद…

Read More

धोबी समाज महासंघा तर्फे पिंपरी येथे दिनदर्शिका २०२५ चे वितरण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ सर्व भाषिक व संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था व संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कजगाव पिंपरी येथील समाज बांधवांना ‘दिनदर्शिका २०२५’ चे वितरण करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव शंकरराव निंबाळकर, जिल्हाध्यक्ष अरुण राऊत, संत गाडगेबाबा…

Read More

‘इंग्लिश फॉर ऑल’ या केंब्रिज प्रेस निर्मित पुस्तकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार इंग्रजी विषयाच्या प्रथम वर्ष पदवी स्तरासाठी आवश्यक ‘इंग्लिश फॉर ऑल: ए कोर्स इन कम्युनिकेशन स्किल’’ या केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस निर्मित पुस्तकाचे प्रकाशन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते विद्यापीठात करण्यात आले. विद्यापीठाच्या इंग्रजी भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ….

Read More

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी IMR येथे राज्य CET ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : व्यवसायिक कोर्स एम.बी.ए, बी.बी.ए., बी.सी.ए., बी.एम.एस. आणि एम.सी.ए. आणि एमसीए (इंटिग्रेटेड) च्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता राज्य सामाईक परिक्षांसाठी (सीईटी) ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली असून, आयएमआर मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा निशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सीईटी ची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सूचना…

Read More
Top
error: Content is protected !!