दोन सख्ख्या भावांचा धारदार हत्याराने खून ! तीन दिवसात तिसरा खून; पोलिसांसमोर मोठे आव्हान
रत्नागिरी | दि.१( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील गोळप गावी पावस बायपास रोडलगत एका आमराईत रखवाली करणाऱ्या दोन नेपाळी सख्ख्या भावांचा खून करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी कामगार आंबे काढण्यासाठी बागेत गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. भक्त बहाद्दूर थापा (वय ६०), ललन बहाद्दूर थापा (वय ५५) (मूळ रा. नेपाळ, सध्या आंबा बाग, गोळप)…
