Headlines
Home » क्राईम » बिटकॉइन घोटाळ्यात राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने केली जप्त

बिटकॉइन घोटाळ्यात राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने केली जप्त

नवी दिल्ली | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– बॉलीवुड जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. एकूण ९७.७९ कोटींची ही मालमत्ता आहे. त्यांचा बंगला आणि ईक्विटी शेअर्स ईडीने जप्त केले आहेत. आज सकाळीच ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे मात्र संपूर्ण बॉलिवूड हादरून गेले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राज कुंद्रा याच्यावर कारवाई केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत जुहूमधील शिल्पा शेट्टीच्या नावे असलेला फ्लॅट, पुण्यातील बंगला तसेच इक्विटी शेअर्सही ईडीने जप्त केले आहे.

दरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांचे नावं बिटकॉईन घोटाळ्यात आले होते. हा घोटाळा जवळपास दोन हजार कोटींचा असल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकरणात २०१८ मध्ये या दोघांनाही ईडीने समन्स बजावले होते. त्यावेळी त्यांची चौकशीही झाली होती. मुख्य आरोपी अमित भारद्वाजला तेव्हा अटक करण्यात आली होती. हा घोटाळा मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याने पैसे प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

सदर घोटाळ्यातील आरोपींनी लोकांकडून बिटकॉइन्सच्या रूपात पैसे गोळा करुन, त्यांना दरमहा १० टक्के रक्कम बिटकॉइन्सच्या रूपात परतावा देण्याचे खोटे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. आरोपींनी या माध्यमातून लोकांकडून मोठ्या प्रमाणात म्हणजे ६,६०० कोटी रुपये रक्कम लुटली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ईडीच्या तपासात कुंद्रा यांनी युक्रेनमध्ये बिटकॉइन माइनिंग फार्म उभारण्यासाठी गेन बिटकॉइनचे पॉन्झी घोटाळ्याचा मास्टरमाइंड आणि प्रवर्तक अमित भारद्वाज यांच्याकडून २८५ बिटकॉइन्स मिळाले होते असे ईडी ने जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे. सौदा पूर्ण न झाल्याने अजूनही हे बिटकॉइन कुंद्रा च्या ताब्यात आहेत. सध्या त्या २८५ बिटकॉइन्सची किमंत भारतीय रुपयात जवळजवळ १६५ कोटींच्या दरम्यान आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!