Headlines
Home » सामाजिक » वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतला संदल उत्सवात सहभाग

वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतला संदल उत्सवात सहभाग

पाचोरा | दि. १८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील मानसिंगका मार्केटमध्ये आज आयोजीत करण्यात आलेल्या पीर सैयद गयबान शहावली यांच्या संदल-ए-मुबारक उत्सवात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होत आशीर्वाद घेतला.

पाचोर्‍यासह परिसरातील हिंदू व मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून पीर सैयद गयबान शहावली या धार्मिक स्थळाची ख्याती आहे. या दर्ग्यावर आज परंपरेनुसार संदल-ए-मुबारक उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन एएसआय शकील शेख, पोलीस बॉईज असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नदीम शकील शेख आणि दर्ग्याचे मुजावर शेख दादामिया यांच्या वतीने करण्यात आले.

आज संदलचे औचित्य साधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी दर्ग्यावर जाऊन दर्शन घेतले. आयोजकांतर्फे ताईंचे स्वागत करण्यात आले. तर, ताईंनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्या सोबत पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!