Headlines
Home » जळगाव » नवरात्रोउत्सव : सहावी माळ ;नारीसमाजस्य कुशलवास्तूकारा! जागर स्त्री शक्तीचा

नवरात्रोउत्सव : सहावी माळ ;नारीसमाजस्य कुशलवास्तूकारा! जागर स्त्री शक्तीचा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वर्षा प्रदिप पाटील यांचे शिक्षण बी.कॉम झालेले असून जवखेडा बु.ता. एरंडोल जिल्हा जळगाव येथील प्रगतशील शेतकरी ( महारु ) रामकृष्ण पाटील यांची ही मुलगी. गावातील अनेक गरीब मुलींचे लग्न लावून देण्याचे तसेच गरीब लोकांना आरोग्य सेवेत दवाखाना खर्च देण्याचे, कर्जबाजारी शेतकरी यांना वेळोवेळी आर्थिक मदत करणे, काहींना तर शेती दिल्या आहेत. असे कार्य बाबा कै. ( मानसिंग आप्पा ) यांनी केले होते. हिंगोणे गावात बाबांनी शाळा सुरू केली आहे. आपल्या बाबांचे असे अनेक सामाजिक कार्य वर्षा पाटील यांनी लहानपणी अगदी जवळून पाहिले आहेत. हेच संस्कार वर्षावर घडले आहेत. त्यांच्या लग्नासाठी अनेक सरकारी नोकरी करणारे मुलांचे स्थळे आली. पण त्यांच्या बाबांचे पडलेले सामाजिक संस्कारांमुळे त्यांनी सामाजिक कार्य करणारे जळगाव येथील प्रदिप पाटील (राजपूत ) यांच्या सोबत लग्न केले. आणि प्रदिप पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, देशसेवा कार्य करतांना आज वर्षा पाटील या रनरागिणी दिसत आहे.

वर्षा प्रदिप पाटील
(मातृभूमी कमांडो फोर्स संचालिका )

आज वर्षा पाटील यांनी मातृभूमी रेस्क्यू कमांडो फोर्स ची स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र भरातील पोलीस प्रशासनाला आपत्तीच्या वेळी मदत करण्याचे कार्य ते करीत आहेत. अनेक पोलीस भरती, सैन्यभरतीत भरती होणाऱ्या मुलांसाठी आपत्ती रेस्क्यु फोर्स सुरू केली आहे. या फोर्सच्या उद्देश सांगताना त्या सांगतात की, ज्या गरीब युवकांना भरतीबद्दल योग्य मार्गदर्शन व्यवस्थित मिळत नाही. तसेच आर्थिक परिस्थिती किंवा काही कारणास्तव जे युवक भरतीत सहभागी होऊ शकत नाहीत अशी मुलं- मुली हे अनेकवेळा डिप्रेशनमध्ये जातात. काही युवक आत्महत्या करू पाहतात. अशा मुलांचे समुपदेशन करून त्यांना MCF फोर्स मध्ये जॉइनिंग करून ट्रेनिंग देऊन ठिकठिकाणी कामाचे पॉईंट देऊन त्यांचे पोलीस व आर्मी भरतीचे स्वप्न पूर्ण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे देश सेवेचे कार्य करीत आहेत.

या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना बलिदान द्यावे लागले आहे, तेव्हा कुठे देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपण या देशाचे समाजाचे देणं लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपणास आरक्षण नाही तर स्वरक्षणाची अत्यंत गरज आहे. असे युवकांना समजून सांगण्याचे कार्य वर्षा पाटील हे करीत असतात. या चार वर्षात अनेक मुलांना तयार करून वेळोवेळी पोलीस भरतीचे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून अनेक युवकांना मदत मिळवून दिली आहे.

चार मुल MSF मध्ये तर दोन युवक पोलीस मध्ये एक मुलगी होमगार्ड मध्ये भरती झाले आहेत, असे यश युवकांना मिळून देण्यासाठी दिवस रात्र वर्षा पाटील यांचे कार्य सुरू आहे. भर कोरोना मध्ये पोलीस प्रशासनासोबत रात्री बेरात्री पेट्रोलिंग करून अनेक लोकांना वेळेवर हॉस्पिटल मध्ये पोहचवून जीवनदान देण्याचे कार्य यांनी केले आहे. हे कार्य पाहून पोलीस प्रशासनाने गौरव ही केला आहे. याच बरोबर मासिक पाळी या विषयावर प्रत्येक शाळा कॉलेज तसेच महिला मंडळ, महिला बचत गट गाव पातळी या ठिकाणी जाऊन व्याख्यानाद्वारे महिला सक्षमीकरण या विषयावर जनजागृती करण्याचे तसेच घटस्फोटीत महिलांना मार्गदर्शन करून रोजगार मिळवून देण्याचे कार्य त्या करीत आहेत.

त्याच बरोबर मुलींना लाठी काठी स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. तसेच शासनाच्या योजना घरोघरी पोहचवण्याचे कार्य करून आरोग्य चळवळ सुरू केली आहे. या आरोग्य चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण भारतात अल्प दरात (एम.आर.आय.) बॉडी चेक अप आरोग्य कॅम्प घेऊन आरोग्य सेवा देण्याचे भव्य दिव्य कार्य करीत आहेत. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या खेड्यातील युवकांसाठी जळगाव शहरात लवकरच एक अभ्यासिका केंद्र व निवासी वस्तीगृह सुरू करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

सामाजिक कार्यात स्वतःला समर्पित करून अनेक युवकांना प्रेरित करून त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत. अनमोल असे सामाजिक शैक्षणिक, वैद्यकीय देश सेवा बजावणाऱ्या विविध सन्मान आणि पुरस्कार प्राप्त या भगिनीला आजची सहावी माळ अर्पण.

One thought on “नवरात्रोउत्सव : सहावी माळ ;नारीसमाजस्य कुशलवास्तूकारा! जागर स्त्री शक्तीचा

  1. देशासाठी व समाजासाठी लढनारे वर्षा ताई वह प्रत्येक स्त्री आमच्या साथी झांसीची रानी आहे, आशा सेवकांना मनपूर्वक खूब-खूब शुभेच्छा 🙏जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!