नवी दिल्ली | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तैवानची राजधानी तैपेई येथे सकाळी ७:५८ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या हादऱ्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. मागील २५ वर्षातील तैवानमध्ये आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जात आहे. या भूकंपाची तीव्रता ही ७.२ रिश्टर स्केल नोंदवली गेली. त्याचा केंद्रबिंदू बेटाच्या पूर्वेला हुआलियन शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर होता.
भूकंपामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून या भूकंपानंतर लगेचच जपान मध्ये त्सुनामी इशारा देण्यात आला असुन ३ मीटर म्हणजे जवळजवळ ९,८ फूट पर्यंत त्सुनामी येण्याची शक्यता आहे. ओकिनावाच्या दक्षिणेकडील प्रीफेक्चरजवळील किनारपट्टीच्या भागांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भूकंपाने तैवानच्या पूर्वेकडील हुआलियन शहरातील इमारतींचा कोसळल्या आहेत. तर रेल्वे सेवा बंद करण्यात आली. तैपेईमध्येही मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे.
