Kohali announces retirement from T20 : भारतीय टी-20 क्रिकेटमधील या दिग्गजाने क्रिकेटच्या छोट्या फॉरमेटमधून निवृत्तीची घोषणा करताच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील एक “विराट” पर्व संपले आहे.
वास्तव पोस्ट न्यूज | टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतरही विराटवर रोहित शर्मा आणि द्रविड यांनी विश्वास टाकला. एक क्लास खेळाडू असून तो मोठ्या सामन्याचा खेळाडू असल्याचं रोहित शर्मा आधीच बोलला होता. रोहित-विराट जोडी मैदानात उतरली. फायनल मध्ये विराट कोहलीने एक बाजू सावरून धरली. कमी स्ट्राईक रेटचा ठपका लागला तरी त्याने केलेल्या धावाचं महत्त्वाचा ठरल्या. विराट कोहलीने ५९चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून विराटने केली निवृत्तीची घोषणा :
‘हा माझा शेवटचा टी-२० विश्वचषक होता, आम्हाला हेच साध्य करायचे होते. विराट पुढे म्हणाला, ‘हा माझा शेवटचा टी-२० सामना होता. हे आमचे स्वप्न होते, आम्हाला आयसीसी स्पर्धा जिंकायची होती, आम्हाला चषक उचलायचा होता. मी परिस्थितीचा आदर केला, एकाग्र राहिलो आणि माझ्या संघानुसार खेळलो. खरे सांगायचे तर, हे कसे घडले यावर माझा विश्वास बसत नाही, माझी स्पर्धा जितकी वाईट होती, तितकीच फायनलमध्ये कामगिरी करून मला आनंद होतो.
आम्ही फायनल हरलो असतो तरी मी माघार घेतली असती. आता नव्या पिढीने जबाबदारी घेतली पाहिजे. २ वर्षांनंतर विश्वचषक होणार आहे, भारतात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत, ते टी-20 फॉरमॅटमध्ये संघाला पुढे नेतील. मला खात्री आहे की ते यापुढेही असेच भारतीय ध्वज फडकावतील.
