Headlines
Home » क्रीडा » टी-20 विश्वकपच्या सेमी फायनलमध्ये आज भारत आणि इंग्लंड संघात हाय व्होलटेज सामना

टी-20 विश्वकपच्या सेमी फायनलमध्ये आज भारत आणि इंग्लंड संघात हाय व्होलटेज सामना

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक स्पर्धेत रंगत निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिका संघाने अफगाणिस्तानचा पराभव करुन अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आज भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ८:०० वाजता भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य सामना होईल. यातील विजेता संघ फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत भिडनार आहे.

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत विरुद्ध इंग्लंड संघात दूसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. गयानामध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ८:०० वाजता हा सामना होणार आहे. आज सकाळी पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण अफ्रीका संघाने अफगानिस्तान संघाचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

भारतीय संघ आज इंग्लंडशी दोन हात करण्यास तयार असुन फायनल मध्ये दक्षिण आफ्रिके सोबत लढत देण्यासाठी प्रयत्नात असेल. दक्षिण आफ्रीका प्रथमच टी-20 च्या फायनल मध्ये पोहचला आहे, तर सलग दोन वेळा भारत आणि इंग्लंड संघ सेमी फायनल मध्ये भिड़नार आहेत. २०२२ मध्ये इंग्लंडने भारतावर १० गडी राखत विजय मिळविला होता.

यावेळी मात्र भारताचे पारडे इंग्लंडपेक्षा मजबूत असुन त्या पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी भारताकडे असणार आहे. भारतीय गोलंदाज सध्या भन्नाट लयीत असुन फलंदाज सुद्धा बऱ्यापैकी आपले योगदान देत आहेत. ह्या स्पर्धेत टीम इंडियाची समस्या म्हणजे पहिल्या गड्यासाठी मोठी भागीदारी आणि विराट कोहलीचा फॉर्म ही आहे. तरी देखील आजच्या सामन्यात भारत प्रबळ दावेदार आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार तसेच २०१०च्या टी-20 वर्ल्ड कपचा विजेता कॉलिंगवूडने म्हटले आहे की ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर मला वाटत नाही की भारत इथे हरेल. भारतीय संघाला हरवण्यासाठी इंग्लंडला खूप विलक्षण असे काहीतरी करावे लागेल. जसप्रीत बुमराहचा सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याची गोलंदाजी अचूक आणि कौशल्यपूर्ण आहे. त्यासाठी कोणत्याही संघाकडे उत्तर नाही.’

आजच्या या दुसऱ्या सेमी फायनलवर पावसाचे सावट असुन पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर टी-20 च्या जागतिक क्रमवारीत टीम इंडिया टॉपवर असल्याने टीम इंडियास फायनल मध्ये सरळ प्रवेश मिळेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!