Home » जळगाव » केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मातोश्री आनंदाश्रमाला भेट

केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मातोश्री आनंदाश्रमाला भेट

जळगाव ( वास्तवपोस्ट ) : आज दि. १४फेब्रुवारी २०२५ चे मातृ पितृ पूजन दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागाच्या   विद्यार्थ्यांनी मातोश्री आनंदाश्रमाला भेट दिली. या भेटीदरम्यान जवळपास ६० ते ७० विदयार्थी उपस्थित होते. या भेटीचा मुख्य उद्देश तेथील वृद्धांचे आशीर्वाद घेणे व त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे.

या भेटीप्रसंगी विद्यार्थ्यांनी व स्टाफ ने अन्नदान व फळं वाटप केले तसेच वृद्धांना कार्यक्रमात सहभागी  करण्यासाठी विविध प्रकारचे खेळ, श्लोक, भक्तीगीत इत्यादीचे आयोजित केले. विशेष म्हणजे आनंदाश्रमातील वृद्धांनी कार्यक्रमास चांगला प्रतिसाद दिला. या भेटीचा मुख्य उद्देश सामाजिक बांधिलकी होता. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.कोमल जैन यांनी केले. कार्यक्रमांस प्रा. हर्षा देशमुख, डॉ। वीणा भोसले, प्रा. डिगंबर सोनवणे, प्रा. तानिया भाटिया, प्रा.मकरंद गोडबोले, प्रा.रेवती पाटील, प्रा. देवेंद्र पाटील, प्रा.प्राची पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला भावेश भंसाली, तन्मय श्रॉफ, नेहा लोंढे, आयुषी ओचानी इ. विद्यार्थ्यांनी मदत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!