मुंबई दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव , आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवीणारे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
भारताचे माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंग यांनी १९७९ ते १९८९ या काळात सेवा दिली. ते त्यांच्या शेतकरी समर्थक धोरणांसाठी आणि ग्रामीण विकासाच्या समर्थनासाठी ओळखले जातात. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरींपैकी एक म्हणजे “जमीनदारी निर्मूलन कायदा” ची अंमलबजावणी करणे, ज्याचा उद्देश सरंजामशाही व्यवस्थेचे उच्चाटन करणे आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जमीन सुधारणा सुनिश्चित करणे. याव्यतिरिक्त, सिंह यांनी कृषी विकासाला चालना देण्यासाठी, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी पाणी व्यवस्थापन आणि सिंचन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्य केले.
भारताचे नववे पंतप्रधान श्री पी.व्ही. नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. अविभाजित आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या जमीन सुधारणांनी कृषी विषमता दूर केली सोबतच ग्रामीण विकासाचा पायाही घातला, ज्यामुळे प्रदेशात आर्थिक स्थिरता वाढली. १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाचे लोकशाहीकरण करणे, नवोपक्रमाला चालना देणे आणि नवोदय विद्यालयाद्वारे प्रवेशाचा विस्तार करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठे योगदान लाभले.
भारतातील हरित क्रांतीचे जनक आणि कृषि वैज्ञानिक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांनी केलेले यशस्वी प्रयत्नांमुळे भारत धन-धान्याने समृद्ध बनला आहे. १९४९ मध्ये बटाटा, गहु, तांदुळ आणि ज्युट यांच्या गुणसूत्रांवर संशोधनाने करीयरची सुरुवात केली होती. हरित क्रांती कार्यक्रम अंतर्गत त्यांनी अधिक उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या आणि तांदळाच्या जाती शोधून काढल्या. त्यांच्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना फायदा झाला असून भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. स्वामीनाथन यांनी १९४३ मध्ये बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळ आणि देशातील अन्नधान्याच्या टंचाईचा अनुभव आल्यानंतर त्यांनी कृषिक्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी झुलॉजी, एग्रीकल्चर दोन्ही विषयात विज्ञानात पदवी संपादन केली होती.
