Headlines
Home » जळगाव » क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये रुचिका वसंत सोनवणे ची उत्कृष्ट कामगिरी

क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये रुचिका वसंत सोनवणे ची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल व्दारा के.सी. ई. सोसायटीच्या विद्यार्थ्यांकरीता के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन २१ ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान करण्यात आले होते. यात शालेय प्राथमिक गट इयत्ता पहिली ते चौथी या गटात गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक शाळेची खेळाडू विद्यार्थिनी रुचिका वसंत सोनवणे हिने मैदानी स्पर्धेत २००मी. रनिंग व ५०मी. रनिंग स्पर्धेत अनुक्रमे गोल्ड व सिल्वर पदक प्राप्त केले.

विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल एकलव्य क्रीडा संकुलचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ . श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. रणजीत पाटील सर यांनी अभिनंदन केले. खेळाडू विद्यार्थिनिस डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर सरांचे मार्गदर्शन लाभले. रुचिकाच्या ह्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!