Home » जळगाव » झांबरे विद्यालयात गाईड शिबीर उत्साहात संपन्न

झांबरे विद्यालयात गाईड शिबीर उत्साहात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील जुने भगवान नगर किलबिल शाळेत ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींचे एक दिवसीय गाईड शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गाईड दौड व योगासनाने केली त्यानंतर लेडी बेडन पॉवेल यांना मानवंदना करून ध्वजगीत व सर्वधर्मीय प्रार्थना घेण्यात आल्या.

सदर शिबिरात गाईड विद्यार्थिनींनी बिना भांड्यांचा चुलीवरचा स्वयंपाक करून वेगवेगळ्या प्रकारच्या पाककलांचे प्रदर्शन करून तंबू सजावट केले. तृप्ती आटाळे व रत्नप्रभा नेमाडे यांनी तंबूचे निरीक्षण केले गाईड विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी स्ट्रेचर दोरीच्या गाठींचे प्रकार व स्कार्प चे वेगवेगळे उपयोग कसे करावे ते सांगून बौद्धिक माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी व गाणी शिकविण्यात आली. गाईड ट्रुपला भेट देण्यासाठी किलबिल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे पर्यवेक्षक एन.बी. पालवे, डी.ए पाटील व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दिली.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाची सांगता शेकोटी करून विविध प्रकारचे गीत नृत्याने झाली. गाईड प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा लोहार, वर्षा चौधरी, पूनम कोल्हे व सुचिता बावस्कर यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!