Headlines
Home » होम » राष्ट्रीय स्तरावर अबॅकस मध्ये ओरियन सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे यश

राष्ट्रीय स्तरावर अबॅकस मध्ये ओरियन सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दिल्ली येथे पार पडलेल्या युसी मास अबॅकसमध्ये के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केलेले आहे. ज्यामध्ये आस्था बालकिसनजी चांडक या इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावर पाचव्या लेवल मध्ये व्दितीय स्थान प्राप्त केलेले आहे. तर इयत्ता चौथीचा विद्यार्थी सेजस दिपक जावळे याने चौथ्या लेवल मध्ये दुसरे स्थान मिळविले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना युसी मास अबॅकस चे नेपाळ आणि भारताचे प्रेसिडेंट डॉ. स्नेहल कारिया यांनी स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

विद्यार्थ्यांनी मिळाविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची, समन्वयक शशिकांत वडोदकर , संस्थेचे कोषाध्यक्ष डी.टी. पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!