Headlines
Home » जळगाव » मु.जे. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिवस

मु.जे. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिवस

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माननीय प्राचार्य डॉ.स.ना. भारंबे यांनी भूषवले. कार्यक्रमाला मानव विद्या शाखेचे उपप्राचार्य डॉ.देवेंद्र इंगळे तसेच अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसुर उपस्थित होते.

प्राचार्य भारंबे यांनी आपल्या मनोगतून संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले संविधान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे व आपण त्याचे पालन केले पाहिजे व त्यामुळे आपली प्रगती होईल असे प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संविधानाचे वाचन डॉ. जयेश पाडवी यांनी केले तसेच सूत्रसंचालन प्रा. धनगर यांनी केले असून कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विशाल देशमुख तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अखिलेश शर्मा तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!